Monday, February 4, 2008

Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)

-याचदा ताप हा वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतो. बहुतांशी आजारामध्ये ताप येणे हा प्रकार म्हणजेच आहाराचे प्राथमिक लक्षण असते. या तापाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये घरगुती उपाय केले तर तो खूप फायद्याचा आणि लाभदायक ठरू शकतो. परंतु, जर ताप कमी झाल्यास तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घेणे ईष्ट.

ताप आला असताना लंघन करावे.

साध्या पाण्याच्या ऐवजी संठिचा काढा प्यायला द्यावा.

दिवसातून २ ते ३ वेळेस तुळशिचा आणि आल्याचा म्हणजेच अद्रकाचा रस एकास एक या प्रमाणात घ्यावा.

गरजेनूसार डोक्यावर मिठाच्या पाण्याचा किंवा कोलोन वाँटरच्या पटट्या ठेवाव्यात तसेच संपूर्ण अंग मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावे.

दिवसातून "गूळवेल सत्व" हे कोमट पाण्यासोबत एकास एक या प्रमाणात ३ वेळेस घ्यावे.

मधाबरोबर "गूळवेल सत्वा" चे चाटन द्यावे.

सकाळी संध्याकाळी, गूळवेलीची पाने तुळशिची पाने यांचा ताज़ा रस काढून चमचे या प्रमाणात एक चमचा मधामध्ये मिसळून द्यावा.

घाम येउन ताप उतरण्यास मदत होण्यासाठी अंगात गरम कपडे व पांघरून घालावे.

गरम चहा, कोंफी, आले-हळद घातलेले दूध प्यायला दिल्यास घाम येउन ताप उतरतो.

तापावारचे एक चांगले औषध म्हणजे "काडे चिराईत".

"त्रिभुवनकीर्ति रस" या २-२ गोल्या दिवसातून ३ वेळेस घेतल्यासही ताप उतरतो.

"सुदर्शन चूर्ण" व "महासुदर्शन चूर्ण" २-२ चमचे ३ वेळा गरम पाण्यासह दिल्यास ताप उतरतो.

ताप उतरण्यास मदत होण्यासाठी मुलांच्या डोक्यावर मायेचा हात जरूर ठेवावा.

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog Blog Portal