Sunday, July 31, 2011

शेवग्याच्या (drumsticks) कोवळ्या पानांची भाजी : एक पथ्यकारक रेसिपी

होय! तुम्ही -याचदा शेवगा हे नांव ऐकलं असेल. याला Moringa Oleifera असेही म्हणतात. यालाच आपण सर्वजण इंग्रजीमधे drumsticks म्हणतो. हे एक अतिशय गुणकारी फळ. घरामधे करता येण्याजोगी शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी .... चला एकदा याची कृति बघुन घ्या आणि स्वस्थ, आनंदी रहा .....

साहित्य :
०१. शेवग्याची कोवळी पाने
०२. कांदा
०३. मिरची
०४. लसूण
०५. तेल
०६. फोडणीचे साहित्य
०७. हिंग
०८. ओलं खोबरं

कृति:
शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित. एका कढईत तेल घेउन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांदा बारीक चिरून घालावा परतून घ्यावा. नंतर / लसूण पाकळ्या घालून परताव्यात. नंतर हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करून ते घालावेत. सर्व निट परतले गेल्यावर त्यात चिरलेली भाजी घालून परतावे. झाकण ठेवून वाफेवर शिजवावी. जरूर पडल्यासच पाणी घालावे. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे पुन्हा परतून झाकण ठेवावे. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.

उपयोग:
सर्व प्रकारच्या वात विकारावर शेवग्याची पालेभाजी पथ्यकर उपयुक्त आहे. बरेच दिवसाच्या तापातून उठल्यावर भूक पूर्ववत व्हावी म्हणून ही भाजी खावी. जेवल्यावर धाप लागणे, पोटात गँस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार यात या भाजीचा विशेष उपयोग होतो.

शेवगा या फळाच्या किंवा भाजी म्हणा हवे तर. खरेतर या drumsticks च्या natural benefits and curative properties मुले हे एक नैसर्गिक उपचार म्हणून नावारूपस आलेले आहे. तेव्हा जमेल तेव्हा या नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्या आणि स्वस्थ मस्त रहा....!!!
Post a Comment