Showing posts with label Intensive Care Unit. Show all posts
Showing posts with label Intensive Care Unit. Show all posts

Thursday, July 24, 2008

ICU : Ice Cream Unit

मुलांना हाँस्पिटलमध्ये दाखल करणे म्हणजे तारेवरची कसरत! इथे आपण त्यांच्या मनात चाललेल्या मानसिक आंदोलनाला सामोरे कसे जायचे याचा अनुभव घेणार आहोत.

खरे तर मुलांना हॉस्पिटल मध्ये घेउन जाण्याचा प्रसंग कुणाही पालकावर येऊ नये. तुम्हाला त्याच्या आरोग्याची काळजी लागलेली असते आणि त्याच बरोबर घरापासून दूर गेल्यावर ते आँपरेशनच्या भितीने कसे वागतील याचीही काळजी मनात घर करून बसलेली असते.

परंतु इथे आशा ब-याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत की, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलचा हा अनुभव सुसह्य होइल.

हॉस्पिटल मध्ये जाण्यापुर्वी:

सत्य हे आवश्यक असते. त्यांच्या वयाला अनुसरून हॉस्पिटल व आँपरेशनची माहिती ह्ळूवारपणे थोड्याश्या प्रमाणात त्यांना दया. जेणेकरून त्यांची मानसिक अवस्था हॉस्पिटल व आँपरेशनच्या च्या विषयाला तयार होइल.

तुमच्या मुलाची समज जर चांगली असेल, तो जर परिस्थिति समजुन घेणारा असेल तर त्याला सांगा की, आपण हॉस्पिटलमध्ये बरे होण्यासाठी चाललो आहोत. आँपरेशनची गरज का आहे? हे त्यांना समजून सांगा. बरीच मुले अशी विचार करतात की, हॉस्पिटलमध्ये जाणे म्हणजे शिक्षा आहे. तेव्हा त्याना हे सर्व समजले आहे याची खात्री करा. तुमच्या मुलांना पुढील गोष्टींची अथवा हॉस्पिटलमध्ये घडणा-या पुढील गोष्टींची खुप माहिती देऊ नका. त्याना समजाउन सांगा की आपण इथे तात्पुरते रहाण्यासाठी आलेलो आहोत. अशावेळी प्रत्येकजण निराश होणे साहजिकच आहे. रक्त्ततपासनिची गरज लागल्यास ते त्याना न दुखवता समजाउन सांगा. अशावेळी तुमच्यात जर आत्मविश्वास नसेल तर कदाचित ते तुमच्यावर भविष्यात विश्वास ठेवणार नाहित. त्यांच्या या मानसिक तयारीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसना त्यांच्या बरोबर खेळण्यास सांगा किंवा हॉस्पिटलमध्ये त्याच्या बरोबर सर्वांचा एक फोटो काढा.

काही मुलांना आँपरेशनच्या अगोदर हाँस्पिटलला भेट द्यावी लागते, त्यासाठी ते सर्जरी करण्यासाठी तयार आहेत की नाहित ते पाहा. त्यांना त्यांच्या रहाण्याच्या वार्ड मध्ये आणि नर्सेस बरोबर ओळख करून घेऊ दया. मुलांच्या वार्ड पहाणा-या व्यक्तिंशी ओळख करून घ्या, त्यांच्या संपर्कात रहा. लहान मुले ही डॉक्टर्स आणि नर्सेसना खुप प्रश्न विचारतात हे ध्यानात घ्या.

आँपरेशनच्या दिवशी:

मुले जेंव्हा हॉस्पिटल मध्ये येतात तेंव्हा त्यांनी सरळ त्यांच्या बेड वर अथवा वार्ड मध्ये जावयास नको. त्यांनी अगोदर खेळण्याच्या  रूम मध्ये जायला पाहिजे, जेणेकरून ते ऑपरेशनच्या अगोदर विचारातून मुक्त होऊं शांत राहतील. इथे त्यानी हॉस्पिटलचा गाऊन घालायला नको, त्यानी त्यांचा स्वताचा पैजामा ऑपेरेशन थिअटर मध्ये जाताना घालायला पाहिजे. पालकांनी सुद्धा त्यांच्या बरोबर अनास्थेशिया द्यायच्या रूम मध्ये तसेच ऑपेरेशननंतर बाहेरच्या वर्ड मध्ये त्याना घ्यायला तयार असले पाहिजे. मुलाने डोळे उघडल्यानंतर त्याला त्याची आई आणि बाबा समोर दिसायलाच हवेत. मुलांच्या रूम मध्ये किंवा पालकांसाठी असलेल्या रूम मध्ये, बहुतेक हॉस्पिटल मध्ये तुम्हाला रात्रभर रहायची वेळ येऊ शकते. अशा वेळेस तुमच्या मुलाला सांगा की तुम्ही त्याच्याबरोबरच आहात. तुमच्या मुलाला घरी जाण्याची वेळ सांगा आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये असताना काय काय  होणार आहे त्याची कल्पना दया. तुमच्या मुलाला त्या वॉर्डमध्ये  किंवा हॉस्पिटलमध्ये त्याच्या सारखीच अजुन मुले आहेत आणि त्यांनाही लवकर बरे होऊं घरी जायचे आहे हे समजून सांगा. त्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिति पूर्ववत होण्यास मदत. त्यांना त्यांची खेळायची रूम दाखवा, कदाचित त्याना काही वेळ तिथे खेळण्याची इच्छा होइल, त्यामुळे त्यांच्या बाबतीत होणारे मानसिक द्वंद पूर्णपणे संपून जाईल आणि ते समाधानकारक स्थितिमध्ये येतील. जर तुम्हाला कही वेळेसाठी किंवा जेवण्यासाठी  मुलाला सोडून जायचे असेल तर तसे त्याला सांगा की तुम्ही किती वेळ आणि कोणत्या कामासाठी बाहेर जाणार आहात.

हॉस्पिटलच्या वेळेतील होणारी संभावित वाद:

जेव्हा  तुम्ही हॉस्पिटल सोडून जाणार असाल तेव्हा मुलांसोबत मोकळेपणाने आणि प्रामाणिक रहा. काही अवघड अशा केसेसमध्ये त्यांना अमुक एक अशी तारीख सांगू नाका, अशा केसेसमध्ये ठरविल्या पेक्षा जास्त दिवसासुद्धा लागू शकतात आणि हॉस्पिटल मधील रहाण्याचे दिवस लांबू शकतात. अशी मुले जे की हॉस्पिटलमध्ये राहून त्यांचे शिक्षण करू शकतात, अशा मुलांना त्यांच्या जागेवरतीच शिकवणी देण्यास परवानगी दया. त्यांचे घरातील रूटीन जास्तीत जास्त साधारण राहील याकडे लक्ष दया. त्याना वर्ड मधील ऍक्टिव्हिटीमध्ये  भाग घेण्यास प्रद्दुत करा. त्याला त्यांच्या आवडत्या खेळणीची  आवश्यकता असेल तर ते त्याला देण्याची व्यव्यस्था करा. त्यांना घरातील सर्व बातम्या सांगत रहा, जेणेकरून ते घरापासून दूर आहेत याची त्यांना रुखरुख लागायला नको. त्यांना त्यांच्या मित्रांना तो हॉस्पिटलमध्ये कसे रहत आहे, तेथील वातावरण कसे आहे यासाठीचे पत्र लिहिण्यासाठी उद्युक्त करा.

तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी काय करू शकता? 

०१. नविन खेळणी त्याला भेट दया.
०२. कही जुनी आवडती खेळणी आणि पुस्तके भेट दया.
०३. कौटुम्बिक फोटो दाखवा.
०४. सुती कपडे, पैजामा आणि मुलाच्या आवडत्या स्लीपर्स
०५. त्यांचे आवडते पिलोज

तुम्ही जर त्याच्या बरोबर रहू शकत नस्सल तर हे सर्व खुप आवश्यकआहे कारण तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलांच्या संगोपनात मशगुल असता किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाध्य असता.

मुलांचा उस्ताह वाढविण्यासाठीच्या पाच उपयुक्त गोष्टी:

०१. हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांकडून तेथील जगामध्ये होणाऱ्या आवडत्या लोकांच्या किंवा टीवी स्टार, किंवा त्या ठिकाणच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटींची माहिती घ्या.

०२. मुलाना ते बरे झाल्यानंतर तुम्ही त्याना आश्चर्यकारक भेट देणार आहात याची माहिती दया, जसे की कौटुम्बिक सहल किंवा प्राणिसंग्रहालयाची अट

०३. जर हॉस्पिटलमध्ये बाकीच्या लोकांची भेट देण्याची परवानगी असेल तर त्यांना आत जाऊं त्याची विचारपूस करावयास सांगा.

०४. भेटायला येणाऱ्या मित्रांचे कार्ड अथवा त्यांचे नाव त्याला अगोदर सांगुन ठेवा.

०५. जर तुम्हाला एखाद्या पॉप ग्रुपची माहिती असेल तर त्यांना त्यांच्या  कार्डवर "लवकर बरे होऊन घरी ये" अथवा "शुभेच्छा " असे संदेश असलेले कार्ड भेट करा.

तेव्हाच खऱ्या अर्थाने  ICU UNIT हे मुलांसाठी "आइस क्रीम युनिट " ठरू शकेल.