Showing posts with label Sweet. Show all posts
Showing posts with label Sweet. Show all posts

Sunday, November 30, 2008

Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)

मलेरियावर प्रभावी ठरणारी कोयनेलची गोळी कडुपणा मोजण्याचे जणू एक प्रमाणच बणून गेली आहे. त्याचा स्वाभाविक परिणाम मलेरियावरील औषधे टाळ्ण्यात होत असे. आता मात्र लहान मुलांमधिल मलेरियावरच्या उपचारासाठी खास गोड गोळ्या तयार करण्यात आल्या असून आफ्रिकेतील पाच देशांमध्ये झालेल्या चाचण्यात प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे. बेनिन, केनिया, माली, मोजाम्बिक आणि टांझानिया या पाच देशांतील १२ वर्षाखालील ९०० मुलांना या नव्या गोळ्या देण्यात आल्या. चेरीची चव असल्याने मुलांनी गोळ्या थुंकून टाकणे बंद केले. त्यामुळे यापूर्वी वापरल्या जाणा-या औषधांपेक्षाही या नव्या गोळ्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर अधिक चांगले परिणाम दिसून आले.

गोळ्यांच्या कडू चवीमूळे औषधे नाकारण्याकडे किंवा उपचार अर्धवट सोडून देण्याकडे मुलांचा कल असे. त्यातून औषधाना सहजासहजी दाद देणारे मलेरियाचे जंतु निर्माण होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे या नव्या औषधांचे तेथील मलेरिया नियंत्रण संस्थांतील कर्मचा-यांनी स्वागत केले आहे. या नव्या औषधांची किंमतही पूर्वीच्या औषधाईतकिच असल्याचे मुलांवरील उपचारात त्यांचा वापर अधिक लाभदायक ठरेल, असे या चाचण्यांचा प्रकल्प राबविणा-या संशोधकानीलांसेटया नियातकालीकाला म्हटले आहे.

तेंव्हा आता मुलांनी औषधे घेणे टाळू नये.