१९९० मध्ये झालेल्या संशोधनामध्ये "मुलांनी न्याहरी करावी का?" या विषयावर असे आढळले कि जेवल्यानंतर दोन तासांनी मुलांनी खाल्लेल सर्व अन्न त्यांच्या वाढ़ीमुळे व खेळ्न्यामुळे संपुन ते पुन्हा भुकेले होतात.
निष्कर्ष: मुलांच्या चांगल्या वाढिसाठी त्यांना दर दोन ते अडिच तासांनी मनसोक्त खायला अन्न उपलब्ध पाहिजे. शालेत डबा द्यायला पाहिजे व रात्रीचा ८ तासांचा उपास मोडायाला पोटभर गरमागरम मोहविनारा नाश्ता द्यायला हवा. मुले अनुकरनाने शिकतात म्हणून आई-वडिलांनी प्रथम नाश्ता करयाला हवा.
नाश्त्त्याला खावं तरी काय? मांसाहार बरा कि शाकाहार बरा?
जागतिक आरोग्य संघटनेच्या १९८५ मध्ये असे लक्षात आले कि, दोन वाटी भात आणि एक वाटी डाळ ह्यांच्या मिश्रनापेक्षा श्रेष्ठ अन्न या भुतलावर नाही. मांसाहारा इतकीच उत्कृष्ट प्रथिने ह्यातुन मिळ्तात. तसेच वाटिभर हिरवे पदार्थ, कोशींबिर, पालेभाज्या किंवा वाटिभर फळे रोज खायला मिळाली तर कुठल्याही टाँनिकची गरज नाही. हेच अन्न जर बाजारातुन विकत घेऊन खाल्लं तर त्याला घरच्या अन्नापेक्षा दहापट जास्त किंमत पडते.
दाळ-तांदुळ पाणी टाकून गरम केले कि, अनुक्रमे वरण व भात बनतो. चनादाळ, व तांदुळ सुके भाजल्यास अनुक्रमे चने व कुरमुरे, पोहे बनतात. तात्पर्य, दाळ-भात व चने-कुरमु-यात काहीही अंतर नाही. त्यांनी चने, कुरमुरे, शेंगदाणे खाल्ले तरी चालेल.
जे अन्न आपणास पुरेसे उष्मांक (शक्ति) देते ते आपल्याला प्रथिनांचा पुरेसा पुरवठा करते. तेव्हा आपण प्रथिने कमी पडण्याचा विचार करायला नको. फक्त उष्मांकाचा विचार करायला हवा.
कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त उष्मांक (शक्ति) कोणत्या अन्नामध्ये मिळतील? उदा.: १ रुपयांचे १०० ग्रँम सोयाबीन खाऊन ४२० कँलरिज मिळ्तात, तर १०० ग्रँम शेंगदाने (१.५० रु. चे) खाऊन ५०० कँलरिज व २२ ग्रँम प्रथिने मिळ्तात, तर १ रु. चे १०० ग्रँम म्हशिचे दूध केवळ ६७ उष्मांक शक्ति व ४ ग्रँम प्रथिने मिळ्तात.
अशाप्रकारे दूध १० पट महाग पडते. दुधावर अनाठाई ख़र्च केल्यास इतरत्र काटकसर करावी लागते. निसर्गतः गाईच्या दुधामध्ये ९० टक्के पाणी तर म्हशिच्या दुधामध्ये ८५ टक्के पाणी असते. मग आधी दूधवाला व नंतर आई, आजी त्यात आणखी पाणी टाकतात शेवटी २०० ग्रँम दुधामध्ये १० ग्रँम अन्न आणि १९० ग्रँम पाणी असते. हया पाण्यामुळे पोट भरते, परंतु भूक मात्र मरते. सकाळी घरातिल मोठे लोक चहा पितात व मुलांना दूध देतात. अँसिडिटिच्या रोग्यांना खूप भूक लागते. ती मरावी म्हणून दूध देतात. सकाळी उपशिपोटी दूध दिल्याने मुलांची भूक मरते. म्हणून आधी पोटभर नाश्ता देउन नंतर दूध द्यावे. आयुर्वेद तर भुकनाशक दूध केवळ रात्री झोपण्यापुर्वी द्यावे, असे शिकवतो.
आपण जर अशक्त असाल तर ह्याचा अर्थ आपणास जेवढे अन्न लागते तेवढे मिळत नाही. तेंव्हा आपण तर नाश्ता केला, आपला आहार वाढविला व काही आजार असेल तर डाँक्टरकडून दूर करून घेतला तर आपण नक्कीच सशक्त होऊ शकू व शंभर वर्षे सुखाने जगु शकू.
सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के आहार कमी पडल्यामुले भारतीय मुले व लोक अशक्त आहेत. नेहमिच्या आहाराव्यतिरिक्त १०० ग्रँम भाजलेले शेंगदाणे दिवसभरामधे २-२, ४-४ दाने करून एखाद्या व्यक्तिने खाल्ले तर त्या व्यक्तिला २२ ग्रँम प्रथिने आणि ५०० कँलरिज शक्ति ज्यादा मिळेल आणि एवढिच घट सहसा प्रत्येक माणसाच्या व मुलांच्या आहारामध्ये पडते. चने, कुरमुरे ह्यांच्या १०० ग्रँम मिश्रणातुन ३५० कँलरिज उर्जा शक्ति व १५ ग्रँम प्रथिने मिळतील. १०० ते १५० ग्रँम चने, कुरमुरेदेखिल दिवसभरामधे नेहमिच्या आहाराव्यातिरिक्त त्या व्यक्तिने अथवा मुलाने खाल्ले तरी चालेल. ह्याची सुरुवात नाश्त्याने करावी.
मुलांचे वजन दरवर्षि दोन अडिच किलो वाढायला हवं. पण मूल शाळेत गेल्यावर मात्र त्याचं वजन १ किलोने वाढ़ते व त्याची चरबी वाढण्याच्या ऐवजी कमी व्हायला लागते. ह्याचा अर्थ असा होतो कि, मुलांचे पोट भरत नाही. त्यामुळे त्यांच्या वजनात घट होते. ह्याला उपाय?
सर्वानी सकाळी नाश्ता, मुलांना शाळेत डबा व खिशात खाऊ हा हवाच हवा.
No comments:
Post a Comment