Saturday, October 18, 2008

Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १

मित्रांनो, एकीकडे मुलांमधिल कुपोषणाचे प्रमाण वाढ्त चाललेले असताना दुसरीकडे मुलांमधिल लट्ठपणाचे प्रमाणही वाढत चालले आहे. जगभर सर्वत्र ही परिस्थिती भयावह रूप धारण करीत आहे. अशा वेळी पोषण, कुपोषण, अतिरिक्त वजन, लठ्ठपणा, स्थुलपणा, अशा या विषयाशी संबंधित विविध संद्न्याचे नेमके अर्थ जाणुन घ्यायला हवेत, त्यांचा परस्पर संबंधाची माहिती आपल्याला लावता आली पाहिजे.

पोषण म्हणजे जगण्यासाठी आव्यश्यक अशा अन्नपदार्थांचा समावेश असलेल्या संतुलित आहाराचे सेवन. शरीराच्या पोषाणासाठी अन्नाचे होणारे सेवन वापर म्हणजे पोषण. इंग्रजीत न्यटरिशनची व्याख्या करताना, पोषक द्रव्यांचे सेवन, पाचन, आणि वापर या तिन्हीचा त्यात समावेश केला गेला आहे. मालन्यटरिशन म्हणजे पोषणातिल गुण्वत्तेची प्रमाणाची कमतरता. म्हणजेच कुपोषण किंवा अयोग्य अपु-या आहारामुळे होणारी अवस्था. मुलांमध्ये अयोग्य आहार, अनावश्यक आहार सेवन केल्यानेही लट्ठपणा निर्माण होतो.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या लट्ठ्पणाच्या व्याखेमध्ये "आरोग्यावर दुष्परिणाम होइल एवढ्या प्रमाणात अँडिपोज पेशिंमध्ये मेद साठणे" असे शब्द वापरले आहेत. "ओव्हरवेट म्हणजे "ज्यादा वजन", "ओबेस" म्हणजे "फाजिल लट्ठ" किंवा "स्थूल", या दोन्ही शब्दांचा अर्थातिल फरक लक्षात घ्यायला हवा. "लट्ठपणा" यालाच आपल्याकडे आणखी काही पर्याही शब्द आहेत. त्यात फोफसा, फाजिल लट्ठ्पणा, शरीरभर मेदोव्रृद्धी हे प्रमुख. अतिरिक्त मेदोवृद्धिलाच इंग्रजी भाषेत अनुक्रमे "ओबेस" आणि "ओबेसिटी" असे म्हटले जाते.

..... उर्वरित भाग पुढील सत्रात

No comments: