बरोबर आहे! मुलांनी त्यांच्या टिचर बरोबर रहाणे एक चांगली सवय आहे. याचे कारण असे की, मुलांनी त्यांच्या टिचर बरोबर घालविलेला हा वेळ त्यांचे वर्गातील वातावरण आनंदित ठेवण्यास मदत करते.
आणि हो, अजुन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, ती अशी की, टिचर बरोबर राहिल्याने मुले smart होतात आणि माणसे ओळखण्याची त्यांना सवय लागते आणि ती सवय त्यांना पुढील आयुष्यात खुप कामाला येते.
परंतु खरेतर, इथे teacher बरोबर जायलाच हवे असे फार मोठे महत्वाचे कारण सापडत नाही. तसे पाहिले तर, teachers बरोबर रहाणारी मुले नुसती त्यांच्याकडून शिकतच नाहित तर त्याना प्रश्न विचारताना ते सहज असतात त्यांच्यावर प्रश्न विचारण्याचे कोणताही मानसिक दबाव नसतो. यामुले मुलांना एकप्रकारे teachers कडून मदतच होत असते. यामुळे कठीणातला कठीण असा विषय मुले सहज शिकू शकतात आणि परिक्षेमधे त्यांचा चांगला performance दिसून येतो. मुलांनो, जेव्हा तुमची इथे सांगितल्या प्रमाने teacher बरोबर relationship झाली तर तुमचे teacher अथवा madam या तुमच्या प्रश्नाला समर्पक आणि चांगले उत्तर देऊन तुमच्या ज्ञानात भर घालण्याचे काम करीत राहतील.
मुलांनो, तुम्ही जेव्हा तुमच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत असता तेव्हा तुमचे हे दिवस म्हणजे आयुष्यातील एक नवलाइची पायरी असते. तुम्ही स्पंज सारखे असता, आणि सदैव उस्ताहवर्धक माहिती ज्ञात करण्यासाठी तयार असता. यापेक्षा पुढे जाउन जर विचार केला तर, तुम्ही या मिळविलेल्या माहितीचा एका नवीन मार्गाने वापर आणि विचार ही करू शकता.
हे सगळे तुमच्या teachers किंवा madam ना माहिती असते. एक लक्षात ठेवा, teacher ना सुद्धा मन असते, आणि त्यांनाही तुम्हाला शिकविल्याचा पदोपदी आनंद होत असतो. यामुलेच मी असे म्हणतो की, teacher ची जागा ही नेहमी वरची असते.
काही मुले ही कोणत्याही परिस्थिति मधे शिकण्यासाठी तयार असतात. भले मग त्याना teacher आवडत असोत वा नसोत. परंतु बरीचशी मुले ही संवेदनशील असतात जे नेहमी teacher बरोबर असतात. आणि जेव्हा काही गोष्टी बरोबर होत नसतील तर ते शिकण्यासाठी तयार होत नाहित अथवा क्लास रूम मधील वातावरण अनभवु शकत नाहित.
No comments:
Post a Comment