Friday, June 11, 2010

Family Doctor (फॅमिली डाँक्टर)

गृहिणी स्वत:सोबतच कुटुंबाच्या आजाराकडेही लक्ष देते. आजारी माणसाची पहिली काळजी घ्यावी लागते ती ग्रुहिणीलाच.काही सामान्य आजारांवर घरच्याघरी कुठले उपाय करता येतात ते पाहू.


आत्ताच पावसाची एक सर येउन गेली आणि मला शिंक देऊन गेली. उन्हाळ्याच्या गरम वाफेतून बाहेर येताना जशी पावसाची चाहूल लागते आणि तो येणारा पहिला पाउस मनाला सुख देऊन जातो त्याचबरोबर नकळत अनेक आजारांना आणि व्याधींनाही निमंत्रण देतो. काही काही आजार तर कोणतेही लक्षणं दिसत नसतानाही येतात. म्हणुनच सर्वानी स्वत:ची तसेच आपल्या स्वकियांचिही काळजि घ्यायला नको का? पावासाळ्याच्या या पहिल्या सरीबरोबर येणारे हे खालील आजार आणि त्यांच्यावरचे घरगुती उपाय आजीबाईच्या बटव्यातून (Fromthe Grandma's Purse) फ़क्त तुमच्यासाठी!!

सर्दिपडसे, कफ:
  • तुळशीरसात साखर घालून प्यावे
  • सुंठ, मिरी, पिंपळी, जिरे, वेलदोड, दालचिनी यापैकी एखादी पूड गरम पाण्यात घ्या.
  • ज्येष्ठ्मध, सुंठाची पूड यांचे मधाबरोबर चाटण घ्यावे.
  • विड्यांच्या पानाचा रस साखर घालून गरम करून घेतल्यास नाक वहाणे, डोकेदुखी कमी होते.
  • राईच्या तेलात कापूर मिसळून छातीला चोळावे.
  • हळदीचे तुकडे विस्तवावर टाकून धूर घ्यावा.
  • सुंठ-वेखंडाचा लेप कपाळावर लावावा.
  • सर्दी घट्ट झाल्यास काळी मिरपूड टोमँटो सुपात प्या. सायनसायटिसमधे त्याचा फ़ायदा होतो. गरम पाण्याची वाफ घ्या, तव्यावर जाड फड़कं गरम करून शेक द्यावा. गरम पाणी प्यावे.
खोकला, कफ:
  • ४ वाटया पाण्यात अडूळशाची पाने ज्येष्ठमध, बडीशेप, बेहडा व गुळ घालून १ वाटी उरेल इतके उकळा व १ चमचा २ वेळा मधाबरोबर प्या.
  • वेलदोडे व सुंठपुडीचे मधासह चाट्ण द्यावे.
  • सुंठ-खडीसाखरेचा काढा प्या.
  • तुळशीचा, आल्याचा व पांढ-या कांद्याचा रस आणि मध् एकत्र करून प्यायल्यास खोकला कमी होतो.
  • थंडीमुळे लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास ओवा, पिंपळी, सुंठ, जायफळ व काळं मिठ पाण्यात वाटावे, कोमट करून गाळून द्यावे.
  • डाळिंबाचा रस, मध् व खडीसाखरेबरोबर द्यावा.
  • दुधात हळद घालून गरम प्यावे.

सर्दी बारीक ताप: 

४ वाटया पाणी, गवती चहा अर्धी जुडी, आलं क़िवा सुंठपूड, दालचिनी पूड, धने, तुळशीची पाने व गुळ / खडीसाखर घालून आटवा. वाटीभर उरल्यावर आवडीप्रमाणे दूध घालून प्या.