Thursday, March 1, 2012

Vitamins For Depression – Solution on Scary Things About Depression

MoodPlusYeah! It is true that depression is an illness that difficult to analyze or understand. Yeah! The depression is the thing that you don't want to get out. I would like to ask you a question here is how you incorporate more and more and you may find yourself dealing with life much more easily? I know it is quite critical to answer.

But here is no need to think more on this issue to get a well and dream sleep at night. Yeah! I come across a solution known as ‘MoodPlus Supplement for Depression’. It is a recommended solution for depression, anxiousness and sleep disturbances and an unhappy and worried mental state to maintain a healthy mood. The solution what the world called it as ‘vitamins for depression’ that surely helps you out from the scary thing about depression. So just shake your hands to manage today’s stress-filled lifestyles.

Monday, December 12, 2011

Nachani Bhakari : (नाचणीची भाकरी)

भाकरी (Bhakari) हा शब्द ऐकताच समोर येते तो जाडसर पांढ-या रंगाचा, गोल पापुद्रा असलेला जवारीचा एक चविष्ट प्रकार. लहानपणी आपण सर्वजणांनी थोड्याफार फरकाने का होईना या भाकरीच्या पापुद्र्याला लोणच्याचा खार लावून किंवा तूप मीठ लावून नक्कीच स्वाद घेतला असेल. आजही मला हा प्रकार अतिशय आवडतो. असो...!!

Nachnichi Bhakari
आज मी तुम्हाला नाचणीच्या भाकरी (Naachnichi Bhaakari) बद्दल सांगणार आहे खरेतरं याचा उपयोग हा अतिस्थूल व्यक्तिंनी वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी लोणी काढलेले ताक घ्यावे. नाचणीची भाकरी ही पचायला हलकी असल्याने कोणत्याही आजारात चालते. विशेषत: गोवर, कांजिन्या या विकारात ती पथ्यकर आहे.

यासाठी लागणारे साहित्य : नाचणीचे पीठ, मीठ व पाणी

Nachnichi Bhakariकृति :

नाचणीचे पीठ चाळून घेउन त्यात थोड़े मीठ घालून पाण्याने घट्ट भिजवावे. जर पीठ दळून बरेच दिवस झाले असतील किंवा भाकरी चिराळायची भीती असेल तर पीठाची उकड़ काढावी. यासाठी एका कढईत दोन वाटया पाणी घ्यावे, ते उकळावे. त्यात थोड़े मीठ घालावे. त्या उकळत्या पाण्यात नाचणीचे पीठ ते दिड वाटी घालावे चांगले ढवळून झाकून ठेवावे. थोड़े गार झाल्यावर पीठ चांगले मळून घ्यावे. त्यातील एक मोठा आंब्याएवढा गोळा घेउन भाकरी थापावी नेहमीच्या भाकरीप्रमाने तव्यावर पीठाची बाजू वर येइल अशी तव्यावर टाकावी. भाकरी थोड़ी गरम झाली की पाणी फिरवावे नेहमीप्रमाने खालच्या बाजूने चांगली भाजली म्हणजे तव्यावरून काढून विस्तवावर भाजावी.

तुम्ही घरी फुलके भाजतात तसेही नाचणीचे फुलके (Nachaniche Fulake) करता येतील. खरेतरं हा प्रकार पिठलं आणि Nachnichi Bhakari असा जर बेत असेल तर मग काही विचारायलाच नको.

हो! पण हे सगळे करण्याअगोदर स्वत:चे वजन मात्र करून घ्या बरं कां?

Sunday, July 31, 2011

शेवग्याच्या (drumsticks) कोवळ्या पानांची भाजी : एक पथ्यकारक रेसिपी

होय! तुम्ही -याचदा शेवगा हे नांव ऐकलं असेल. याला Moringa Oleifera असेही म्हणतात. यालाच आपण सर्वजण इंग्रजीमधे drumsticks म्हणतो. हे एक अतिशय गुणकारी फळ. घरामधे करता येण्याजोगी शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी .... चला एकदा याची कृति बघुन घ्या आणि स्वस्थ, आनंदी रहा .....

साहित्य :
०१. शेवग्याची कोवळी पाने
०२. कांदा
०३. मिरची
०४. लसूण
०५. तेल
०६. फोडणीचे साहित्य
०७. हिंग
०८. ओलं खोबरं

कृति:
शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित. एका कढईत तेल घेउन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांदा बारीक चिरून घालावा परतून घ्यावा. नंतर / लसूण पाकळ्या घालून परताव्यात. नंतर हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करून ते घालावेत. सर्व निट परतले गेल्यावर त्यात चिरलेली भाजी घालून परतावे. झाकण ठेवून वाफेवर शिजवावी. जरूर पडल्यासच पाणी घालावे. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे पुन्हा परतून झाकण ठेवावे. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.

उपयोग:
सर्व प्रकारच्या वात विकारावर शेवग्याची पालेभाजी पथ्यकर उपयुक्त आहे. बरेच दिवसाच्या तापातून उठल्यावर भूक पूर्ववत व्हावी म्हणून ही भाजी खावी. जेवल्यावर धाप लागणे, पोटात गँस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार यात या भाजीचा विशेष उपयोग होतो.

शेवगा या फळाच्या किंवा भाजी म्हणा हवे तर. खरेतर या drumsticks च्या natural benefits and curative properties मुले हे एक नैसर्गिक उपचार म्हणून नावारूपस आलेले आहे. तेव्हा जमेल तेव्हा या नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्या आणि स्वस्थ मस्त रहा....!!!

"ड्रमस्टिक्स लीफ व्हेजिटेबल्स" या विषयावरील महत्त्वाचे 5 प्रश्न आणि उत्तरे

1. प्रश्न: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्या काय आहेत?
उत्तर: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्या ड्रमस्टिकच्या झाडाची कोमल, खाण्यायोग्य पाने आहेत (मोरिंगा ओलिफेरा).

2. प्रश्न: तुम्ही स्वयंपाकासाठी ड्रमस्टिक्स पानांची भाजी कशी तयार करता?
उत्तर: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्या तयार करण्यासाठी, पाने पूर्णपणे धुवा, देठ काढून टाका आणि विविध पाककृतींमध्ये वापरा.

3. प्रश्न: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्यांचे पौष्टिक मूल्य काय आहे?
उत्तर: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे ते तुमच्या आहारात पोषक असतात.

4. प्रश्न: ड्रमस्टिक्स पानांच्या भाज्या वापरणाऱ्या काही लोकप्रिय पाककृती कोणत्या आहेत?
उत्तर: ड्रमस्टिक्स असलेल्या पानांच्या भाज्या असलेल्या लोकप्रिय पाककृतींमध्ये अनेक दक्षिण आशियाई पाककृतींमध्ये स्टिअर-फ्राईज, सूप आणि करी यांचा समावेश होतो.

5. प्रश्न: ड्रमस्टिक्सच्या कोवळ्या पालेभाज्या निरोगी आहारासाठी कशा प्रकारे योगदान देतात?
उत्तर: ड्रमस्टिक्सच्या कोवळ्या पालेभाज्या अत्यावश्यक पोषक तत्त्वे पुरवून आणि संभाव्यत: विविध आरोग्य फायदे देऊन निरोगी आहारात योगदान देऊ शकतात.