Sunday, October 26, 2008

How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३

मित्रांनो, मागील लेखात आपण लट्ठपणाबद्दल पाहिले. आता वजन कसे मोजावे ते पाहू या.

आपण कधी बी. एम्. आय. (B.M.I.) बद्दल एकल आहे का?

आपले वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात असणे आव्यश्यक असते. ऊँची मीटर्स मध्ये मोजावी. वजन किलोग्राम मध्ये मोजावे. या आकड्याचा वर्ग काढावा. मीटर्स मध्ये मोजलेल्या उंचीच्या आकड्याला वर्गाने भागावे. या गुणोत्तराला "बॉडी मॉस इंडेक्स" असे म्हणतात. हे गुणोत्तर १८ ते २२ असणे इष्ट असते. १८ पेक्षा कमी इंडेक्स असल्यास व्यक्ति कृष (अपेक्षेपेक्षा कमी वजनाची) आहे. २२ ते २५ - व्यक्ति बाळसेदार आहे. २५ ते ३० - व्यक्तींचे वजन आवश्यक्तेपेक्षा अधिक आहे (अपेक्षेपेक्षा जास्त वजनाचा). ३० पेक्षा अधिक असल्यास स्थुलपणाचे निर्देशक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढ़ व्यक्तिसाठी बी. एम्. आय. २५ पेक्षा जास्त असणे म्हणजे ओव्हरवेट बी. एम्. आय. ६० पेक्षा जास्त असणे म्हणजे ओबेस. ओबेसिटी टास्क फोर्सनुसार आशिया खंडातील व्यक्तिंसाठी बी. एम्. आय. २३ पेक्षा जास्त असणे म्हणजे ओव्हरवेट आणि बी. एम्. आय. २५ पेक्षा जास्त असणे म्हणजे ओबेसिटी. मुलांमधिल बी. एम्. आय. हा प्रौढ व्यक्तिच्या तुलनेत वेगळा असतो. मुलांमधिल सरासरी बी. एम्. आय. जन्मतः - १३, एक वर्षानंतर - १७, सहाव्या वर्षापर्यंत - १५. आणि विसाव्या वर्षी - २१ असावा, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे.

जागतिक पातळिवर दोन ते पाच या वयोगटातील मुलांमध्ये लट्ठपणाचे प्रमाण १०. टक्के आहे; तर ते ११ वायोगटादरम्यान १५. टक्के मुले लट्ठ आहेत. १९९५ मध्ये मुलांमध्ये लट्ठपणा असण्याचे प्रमाण . टक्के होते, ते २००४ मध्ये १४. टक्क्यांपर्यंत पोचले. हा निष्कर्ष अमेरिकेतील मुलांबाबत असला तरीही तो भारतात लागू होण्यास फार वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळकरी मुलांमधिल लट्ठणाच्या समस्येची व्यापकता भारतातदेखिल असल्याचे धक्कादायक निष्कर्ष आहेत. १५ टक्क्यांपेक्षाही जास्त अमेरिकन मुले, २० टक्के ते २५ टक्क्यांपेक्षाही जास्त ऑस्ट्रेलियन मुले ही आजमितीला लट्ठपणा या साथिच्या आजाराने बाधित आहेत. भारतातील प्रमुख शहरांमध्ये लट्ठपणाचि लागण मुलांमध्ये झाल्याचे निर्दशनास आले आहे. सविस्तर तपशील, आकडेवारी जरी उपलब्ध नसली तरी या स्थुलपनाच्या आजाराची लागण असना-यांची संख्या ही निश्चितच नोंद घेण्याजोगी आहे.

..... पुढिल पुष्पामध्ये आपण मुलांमधिल लट्ठपणाचि कारणे पाहुयात

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १

02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
Post a Comment