Thursday, October 16, 2008

A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)

अंथरुणात शु करण्याची मुलांची सवय ही त्यांच्या बुद्धीच्या वाढीतील कमतरता किंवा त्यांना जाणवणा-या मानसिक ताणाशी अथवा असुरक्षित भावनेशी संबंधित असू शकते. आशा वेळेस काही साध्या औषधानी ही व्याधी दूर करता येते.

लहान मुलांमधिल अनेक तक्रारींवर कुठलेही साइड इफ़ेक्टस होऊ देता, अगदी अलगदपणे, होमिओपँथी आपला प्रभाव परिणाम दर्शविते हे सर्वांनाच माहिती आहे. अशाक अनेक तकारींपैकी अंथरूणात शू करणे (Bed Weting) ही एक अशी तक्रार, की जी मोकळेपणाने पालकांना किंवा मुलांना सांगताही येत नाही. ठराविक वयानंतर मुलांमध्ये मुत्राशयावर ताबा येणे अपेक्षित असते; परंतु काही मुलांमध्ये हा ताबा नसल्यामुळे रात्रि अंथरूणात शु होते.

मुलांच्या बुद्धिची वाढ पुरेशी झाल्यास अथवा नसल्यास असे होऊ शकते. दुस-या प्रकारात मुत्राशयावर ताबा असुनही अशी तक्रार आढ्ळते. यासाठी -याच वेळा शारिरीक कारणे नसून, मानसिक कारणेच महत्त्वाची ठरतात. मानसिक अस्वस्थता, मुलांचे पालकांबरोबरचे तणावपूर्ण नाते किंवा अनेक वेळा, आपल्यावर कोणी प्रेम करित नाही, कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही या भावनेनेही अशा त्रासाचे मुळ असू शकते.

अशा सर्व केसेसमध्ये मधुमेह किंवा मज्जासंस्थेचा विकार त्या मुलांमध्ये नाही ना? याची शहानिशा करून घेणे डाँक्टरांचे कर्तव्य ठरते. 'अंथरूणात शू करणे' या तक्रारीवर होमिओपँथीत अनेक गुणकारी औषधे आहेत. उदा. इक्विसेटम, क्रिओसोटम, बेलडोना, बेन्ज़ोइक अँसिड, न्यँट्म, म्यूर, सेपिया, सिलिशिया इत्यादि. ही आणि यासारखी औषधे नियमितपणे काही काळ (साधारणतः सहा महीने) घेतल्यास या तक्रारिचे मुळ पूर्णपणे नाहीसे होऊ शकते.

या औषधाच्या बरोबरीनेच मुलांच्या मानसिकतेची काळजी घेणे हेही पालकांचे कर्तव्य ठरते. अंथरूणात मुलाने शू केली तरीसुद्धा त्याबद्दल त्याला रागावता, टिका करता, त्याची मानसिकता समजुन घेउन त्याला योग्य तो आधार देणे हेही औषधांइतकेच महत्त्वाचे आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी शू करून झोपण्याची सवय लावणे, झोपेच्या पहिल्या तिन-चार तासानंतर मुलाला शू करायला लावणे अशा प्रकारची मदत औषधाचा परिणाम जलद गतीने साधायला साहाय्य करते. अधिक माहितीसाठी आपण डाँ. अपर्णा पित्रे (होमिओपँथी तज्ञ, पुणे) यांचेशी संपर्क साधू शकता.
संपर्काचा पत्ता:
डॉ. अपर्णा एन. पित्रे, होमिओपँथिक कन्सलटंट,
बी. एच. एम. एस., होमिओ क्लिनीक,
मोबाइल : +९१-९८२२०८६३७२,
इंचार्ज : OPD एन. एम. रानडे हॉस्पिटल
इंचार्ज : होलिस्टिक डायबेटिक क्लिनीक एन. एम. रानडे हॉस्पिटल
प्रोफ़ेसर धोंडुमामा साठे होमिओपँथिक मेडिकल कॉलेज, पुणे.

संबंधित परिक्षणे:

01. पुदिन्याचे गुणधर्म : USEFUL MINT / WILD MINT
02. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
03. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
04. ICU : Ice Cream Unit
Post a Comment