
पुदिन्याचे गुण:
पुदिना हा उष्ण व रुक्ष आहे. याला भूक वाढविणारा म्हणजेच दिपन असेही म्हणतात. हा आर्तवजनक, संकोच-विकास प्रतिबंधक व उत्तेजक आहे. आहारामध्ये याचा वापर पाचक म्हणून करतात.
मंद झालेल्या भुकेवर पुदिन्याचा उपाय:
सकाळी उठल्यावर १ ते २ चमचे रस व रात्री नुसता प्याला तरी चालतो किंवा त्यात थोडेसे सैंधव टाकून प्यावे. आपली मंद झालेली भूक हळुहळू सुधारते. वरचेवर होणारे गँसेस याने कमी होतात.
पोटफुगीवर पुदिन्याचा उपाय:
पोटफुगीवर पुदिनारस १ चमचा +अदरक रस अर्धा चमचा +लिंबू रस १ चमचा +सैंधव चिमुटभर घेतल्यास पोटफुगी थांबते. गँसेस कमी होतात व शौचासही साफ होऊ लागते.
उलटी वर पुदिन्याचा उपाय:
पुदिनारस २० ते ३० थेंब +मध १० थेंब चाटवावा. उलटी थांबते.
काविळेवर पुदिन्याचा उपाय:
काविळेच्या सुरुवातीस याचा वापर उपयुक्त ठरतो.
प्रसुतीज्वरात पुदिन्याचा उपाय:
२ ते ४ चमचे रस रोज घ्यावा. रुग्णाची प्रकृति पाहून हळुहळू मात्रा वाढवली तर रुग्णास मानवते.
ज्वराने व उष्णतेने शरीर एकदम गरम होऊ लागते. अशा वेळी पाण्यातून याचा वापर फायदेशिर ठरतो. चहासारखा उकळून त्यात साखर, अदरक इत्यादी वापरावे, आव्यशक वाटल्यास गवती चहा व लक्षणानुरुप लवंग, दालचीनी टाकता येते.
चक्कर आल्यास पुदिन्याचा उपाय:
चक्कर येणा-या रोग्यास पुदिन्याच्या पाल्याचा रस उपयुक्त आहे.चक्कर आल्यास रसाचे २ ते ४ थेंब नाकात सोडावे.
पुदिन्याच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण:
दात घासण्यास उपयुक्त आहे. याने दात स्वच्छ व पांढरे होतात.
पहाड़ी पुदिना (MENTHA VITIDIS):
याचे तेल बाजारात मिळते. पेपरमिंट सारखेच परंतू गुणास जरा कमी दर्जाचे असते. याचा वापर कफज्वरात होतो. तोंड आल्यावर अगर तोंडात व्रण असल्यास याच्या काढ्याचा गुळण्या कराव्यात. आराम मिळतो.
पुदिन्याचे फुल:
पुदिन्याच्या फुलाला पुतिनाश कर्पूर, पुदिनेका कपुर किंवा मेंथाल म्हणून ओळखतात. याचे उत्पत्तिस्थान चिन किंवा जापान मध्ये असून, कश्मीर व हिमाचलच्या पश्चिम भागावरती याची लागवड करतात.
सुकवलेली ही पुदिन्याची वनस्पती इराण मधून येते. सध्या प्रत्येक केमिस्टच्या दुकानांमधुन ती विक्रिसाठी उपलब्ध आहे.विडयाचा पानात पुदिन्याचा वापर करतात.
मेन्थोलच्या लांब षटकोनी खड्यांची परीक्षा करावयाची झाल्यास :
जर याला पाण्यावर टाकले तर तो तरंगते तोच खरा मेंथालचा खडा होय.
चीनी पुदिन्याचे फुल हे प्रथम तिखट लागते व नंतर त्याचा कडसरपणा येतो. पुदिन्याचा फुलाने जखमेतील घाण कमी होते तसेच याने कफ कमी होतो.
पुदिन्याचा रस हा पोटातुन घेतल्यास आमाशयाची अशक्तता कमी होऊन जुलाब कमी होण्यास मदत होते. पोटातिल वात कमी होतो. तसेच इतर वातरोग, सांधेदुखी, डोकेदुखी यांवरही उपयोग होतो.
पुदिन्याचा मूत्रअश्मरी वर उपाय:
मुतखडा, मुत्राशयातिल व (bladder मधिल) मूत्र खडा हळुहळू पडण्यास मदत होते, व पडताना होणारा त्रास वा वेदना कमी होतात.
गर्भवतिच्या उलट्या पुदिन्याच्या रसाने थांबतात. आतड्याच्या सर्व रोगांवर फुलाचा किंवा तेलाचा वापर करतात.
त्वचेवर आलेल्या बधिरपनावर पुदिन्याचे फुल चोळतात. त्वचेवर खाज येत असल्यास तेलात मिसळून त्वचेवर लावावे. नायटा, गजकर्ण, सौम्य आकाराचा इसब यांवर हे चोळावे, खाज कमी होते.
दमा झालेला असल्यास पुदिन्याच्या अर्काची वाफ घेतल्यास आराम वाटतो. दम्याचा व खोकल्याचा वेग कमी होतो. पुदिन्याच्या अर्काचा शेक हा छातीच्या कमी भागावर तसेच पाठिवर कापडाने द्यावा.
दातदुखी व किडलेले दात यांवर पुदिन्याचा अर्क कापसातुन लाव्ल्यास दातदुखी थांबते व दातातिल किड कमी होते. पेपरर्मिंटची वापरन्याची प्रथाही अशीच आहे.