तिखट आल्याचा तुकडा खाऊन कँन्सरसारख्या असाध्य रोगापासून बचाव होऊ शकतो. असा फुकटचा सल्ला यापूर्वी जर कोणी दिला असता, तर दुर्लक्ष करायला हरकत नव्हती; पण हैद्राबादच्या 'नँशनल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन' या संस्थेने आल्याचा वापर यावर संशोधन करून हे आता सिद्ध केलं आहे. या संस्थेतल्या संशोधकानी उंदरावर प्रयोग करुन हे निष्कर्ष काढले आहेत की, कँन्सरसारख्या असाध्य रोगाला आपण आल्यामुळे दूर ठेऊ शकतो.
पूर्वी खरं तर सर्दी-खोकला, पोटदुखी, मळमळ, नाँशिया, दातदुखी, अर्थ्राइंटिस, सूज अशा सर्व आजारावर औषध म्हणून आल्याचा वापर केला जायचा. आता या नवीन संशोधनाने हेही सिद्ध होतय की, सूज येऊ नये म्हणून वापरलं जाणार आलं कँन्सर होऊ नये, म्हणुनही गुणकारी आहे.
स्वयंपाकातून किंवा रोज नुसतं एक ते दिड ग्रँम आलं खाल्लं, तरी कँन्सर होण्याची शक्यता मावळते. या संस्थेचे उपाध्यक्ष आणि संशोधन संस्थेचे प्रमुख कल्पगम पोलासा यांच्या अंदाजानुसार शिजवल्यावर, तळल्यावर आल्याचे गुणधर्म नाहीसे होत नाहित. कारण हळद, लसूण, कांदा यावर त्यांनी प्रयोग केले आहेत. शिजविल्यावर, तळल्यावर त्यांच्या गुणधर्मावर परिणाम होत नसल्याचं इथल्या संशोधकानी सिद्ध केलं आहे. याच वर्गातील आल्याच्या बाबतीतही हे लागू पडतं, असं त्यांच मत आहे. जरी हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असलं, तरी जगात इतरत्रही यावर मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरु झालेत. अमेरिकेतल्या मिनिसोटा विद्दयापिठातील हाँर्मेल संस्थेनही गेल्यावर्षी त्यांचे आल्यावरच्या संशोधनाचे निष्कर्ष जाहिर केले. त्यातही असं म्हटलं आहे की, आल्याला चव देणारा जो गुणधर्म आहे त्यामुळेच मानवाच्या शरीरात कोलोरेक्युल कँन्सरपेशी वाढण्यास अटकाव होतो.
आल्याच्या वापराने कँन्सरला लांब ठेवणं शक्य आहे, पण कँन्सर झालेल्या रुग्णांचा कँन्सर आल्यामुळे जात नाही. मात्र त्याची वाढ होण्यातले धोके किंवा इतर पुढच्या धोक्यांची तीव्रता आल्याच्या वापराने कमी करता येऊ शकते असं श्री. पोलासा यांचं म्हणनं आहे.
अर्थात, हे झालं NIN संस्थेचं मत, संशोधन निष्कर्ष, पण क्लिनिकल न्युट्रिशन तद्न्य आणि टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये काम करणारे डॉ. मोहनदास यांच्या मते मात्र बरेचदा प्राण्यावर प्रयोग यशस्वी होतात, पण मानवाच्या बाबतीत हे प्रयोग फसतात. त्यामुळेच हळद, आलं, लसूण यांना औषधरुपात स्विकारायची अजुनही डाँक्टरांची तयारी नाही.
वैद्दकिय क्षेत्रातला अंतर्गत वाद जाऊ दे, पण खरचं आलं गुणकारी असेल, तर कँन्सरसारख्या असाध्य रोगाला बाजुला ठेवणं किंवा त्याचं उच्चाट्न करणं सोपं जाणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी एवढा दिलासाही पुरेसा आहे. आपलं काय मतं आहे?
"आले कॅन्सरला दूर ठेवते" या विषयावरील 5 महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे.
1. प्रश्न: आले कर्करोग टाळण्यासाठी कशी मदत करते?
उत्तर: आल्यामध्ये असे संयुगे असतात जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि जळजळ कमी करतात, कर्करोग-प्रतिबंधक गुणधर्मांमध्ये योगदान देतात.
२. प्रश्न: अदरक कोणत्या प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करू शकते?
उत्तर: आल्याने कोलन, डिम्बग्रंथि आणि प्रोस्टेट कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता दर्शविली आहे.
3. प्रश्न: कर्करोग-प्रतिबंधक आहारात आल्याचा समावेश कसा करावा?
उत्तर: आले जेवणात जोडले जाऊ शकते, चहा म्हणून वापरले जाऊ शकते किंवा त्याचे कर्करोगाशी लढणारे फायदे वापरण्यासाठी स्मूदीमध्ये वापरले जाऊ शकते.
4. प्रश्न: कर्करोग प्रतिबंधासाठी आले वापरताना काही खबरदारी किंवा विरोधाभास आहेत का?
उत्तर: विशिष्ट औषधे घेत असलेल्या किंवा विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात आले समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करावी.
5. प्रश्न: आले कर्करोग दूर ठेवते या दाव्याचे समर्थन करणारे वैज्ञानिक पुरावे आहेत का?
उत्तर: होय, अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की आल्याचे बायोएक्टिव्ह संयुगे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात, परंतु निश्चित निष्कर्ष प्रस्थापित करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.