आपल्या कुटुंबात किंवा घरामध्ये जेव्हा कुणी आजारी पड़ते तेव्हा त्यांच्या बाबतितला काही घरातील लोकांचा उपेक्षित असा दृष्टिकोण असतो, त्यांना असे वाटते की आजारी पडणा-याने काही अपराध केला आहे. लहान कुटुंबामध्ये आणि नौकरी करणा-या कुटुंबामध्ये तर कुटुंबातिल एखाद्याचे आजारीपण हा ज्वलंत प्रश्न असतो. खरेतर कुणीही आपल्या मर्जीनुसार आजारी पडत नसतो ना त्यांना आजारी पडण्याचा शौक असतो. जर तुमच्याबरोबर हा प्रकार होत असेल तर तुम्ही –
१. स्वत: घाबरून जाऊ नका; आणि आजारी व्यक्तीला सुद्धा त्याचे भय वाटू देऊ नका. त्यांना दिलासा दया आणि लगेच डाँक्टरला दाखवा. ब-याच वेळेस थोड्याश्या उपेक्षेमुळे गंभीर परिणामाना सामोरे जावे लागते. तुम्ही जर रोगी माणसास डॉक्टर कड़े घेउन जाऊ शकत असाल तर जरूर घेउन जा किंवा त्याना घरी बोलाउन घ्या. तुम्ही कितीही जरी बुद्धिमान असाल तरी स्वत: डॉक्टर बनून त्यांचा इलाज करू नका. रोग्यानीही हे लक्षात ठेवावे की जर घरच्या लोकानी त्यांच्या मर्जीनुसार जर औषध दिले तरी ते घेऊ नये. डाँक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घेणे हितकारक ठरते. आपण आपल्या नौकरीचा मोह करतो परंतु आजारी पणात आपल्या घरातील रोगी माणसांकडून तो आजारी असताना नौकरीचा मोह धरु नका. अर्थात रोग्यास त्वरित इलाज देण्याचा प्रयत्न करा.
२. महिलावर्ग या अशा वेळेस सर्वात जास्त तणावात असतात; कुटुंब-मुले आणि वरून आजारी सदस्य. अशा वेळेस घरातील कुणीही एका महिलेने आजारी माणसाची काळजी घेण्याचे तसेच रोग्यास साह्हाय करण्याची जबाबदारी घेण्याचे उत्तरदायित्व पार पाडावयास हवे जेणेकरुन दूसरी मुलांचा सांभाळ करू शकेल. मुलाना रोग्यापासून दूर ठेवावे.
३. जेव्हा जेव्हा आजारी माणसाची सेवा करावयाची असल्यास, त्यांना औषधि द्यायची असल्यास आपले नाक रुमालाने झाकून घ्यावे; असे करण्याने आजारी व्यक्तीला वाईट वाटावयास नको की त्याच्या जवळ येणारा सदस्य अशा रुपात समोर यावा. हा एक सुरक्षित उपाय आहे.
४. जर तुमच्या कुटुंबातिल सदस्य हां गंभीर आजाराचा शिकार झालेला असेल आणि तुमची आर्थिक स्थिति ठीक नसेल तर त्वरीत चँरीटेबल ट्रस्ट शी संपर्क साधावा. संस्थेला आजारी व्यक्तिचे सर्व पपेर्स दाखवा यामुळे मदद मिळण्यास सोंपे जाइल. मोफत मदद घेण्यात स्वत:चा कमीपणा मानु नका कारण इथे प्रश्न आहे तो एका जिवाच्या जगण्या – मरण्याचा.
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)