मुलांची भावनिक, मानसिक, सामाजिक वाढ निकोप व्हायला हवी असेल तर, पालकांना त्यांच्या भावभावना नेमक्या जाणुन घेता यायला हव्यात. पालक आणि मुलांमध्ये असलेले सुदृढ सुसंवादी नातं हा त्याचा पाया आहे. असं नातं निर्माण करणं हे सोपं नाही, पण, अशक्यही नक्कीच नाही!!.
संस्कारक्षम वयात मुलांची मानसिकता जडणघडण होण्यामागे त्यांच्या आई-वडिलांची भूमिका नेहमीच परिणामकारक ठरते. मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक. दोन्ही त-हेच्या भुमिकांचे परिणाम हे त्यांच्या मुलांबरोबरच्या नात्यात परावर्तित होत असतात. पालकांचे आपल्या मुलांबरोबरचे असलेले नाते; त्याबरोबर ओघानं आलेल्या एक्मेकांबद्दलच्या अपेक्षा, भाव-भावना या सगळ्या गोष्टी खुप महत्वाच्या असतात आणि त्या कधी बोलल्याच जात नसतील किंवा चुकिच्या पद्धतिने व्यक्त होत असतील, तर मुलांवर त्याचे गंभीर परिणाम होत राहतात. म्हणजेच काय? एक तर संवाद होतच नाही अथवा ‘संवादाच’ रूपांतर ‘वादात’ होते आणि मग हळुहळु मुलांची मानसिकता बिघडत जाते. त्यांचा स्वत:कड़े, पालकांकडे आणि पर्यायाने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण नकारात्मक होऊ लागतो आणि या सर्व घटकांचं परिवर्तन नंतर वाईट गोष्टिंमध्ये अथवा सवयींमध्ये होतं. उदाहरणार्थ: समाजविघातक वर्तवणूक, आई-वडिल कुठल्या प्रकारे आपल्या मुलांशी संवाद साधतात. त्याचा सरळ परिणाम मुलांच्या भविष्यातील वर्तनावर, विचार पद्धतीवर, आत्मविश्वासावर, भावनिक स्वास्थावर, दुस-या व्यक्तिंबरोबरच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीवर होतो. स्वत:च्या आई-वडिलांसोबत असतानादेखिल ते स्वत:ला असुरक्षित समजू लागतात. या सगळ्यांचा परिणाम शेवटी त्यांच्या शाळेतिल वागणूक व प्रगतीवर होतो आणि म्हणुनच गरजेचं असतं ते पालक आणि मूल यांच्यातील प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं. (यालाच मानसशास्त्रात ‘living and trusting relation’ असं म्हणतात) त्यासाठीच आवश्यक असतो तो त्यांच्यातील ‘संवाद!’ हा संवाद प्रामुख्याने पुढील गोष्टिंवर अवलंबून असतो.
०२. पालक आपल्या मुलांना त्याची मतं, विचार, भावना व्यक्त करण्यासाठी कितपत वाव देतात.
आता इथे तुम्ही म्हणाल की, हे काही अवघड काम नाहीय. कारण, आम्ही तर आमच्या मुलांशी निटचं बोलतो. चांगल्या प्रकार त्यांचं पालनपोषण करतो. त्यांना जे जे हवं असतं, ते ते त्यांना आणून देतो. मग त्यासाठी वेगळं असं ईथे काय बोलायचं? हो ना? तर, तसं नाहिये. मुलांशी बोलणं म्हणजे ‘तुला काय हवे, काय नकोय?’ हे नव्हे; तसेच त्यांना कपडे, वह्या, पुस्तकं, खेळणी वगैरे वगैरे आणून देण्याइतकं सोप्प तर नक्कीच नाही. कारण मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा (Emotional and Psychological needs) यापेक्षा भिन्न व अधिक असतात. एक ‘सुजाण व जबाबदार पालक’ या नात्याने त्या योग्य वेळी समजावून घेउन त्या पूर्ण करणे, हे सर्वात महत्त्वाचे व अवघड काम आहे. इथे पालकांची खरी कसोटी लागते. ती निभावन्यासाठी लागतो तो ‘संवाद’!
०२. मुलांशी संवाद साधताना एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुमचे विचार व भावना स्पष्टपणे, मोकळ्या मनाने त्यांच्यापर्यंत पोचवणे, कारण असे झाले नाही, तर मुले त्यातून चुकीचे अर्थ काढू शकतात आणि हेच या नात्यामध्ये जवळीक निर्माण होण्यास घातक ठरू शकते.
०३. कुठल्याही सुसंवादाचा पाया असतो, तो म्हणजे समोरची व्यक्ति तुमच्याशी जे काही बोलत आहे, त्याकडे नीट लक्ष देणे. जेव्हा जेव्हा तुमची मूलं तुम्हाला काही सांगत असतात, तेव्हा त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐका. ऐकताना मध्ये मध्ये ‘बर, बर, ठीक आहे,’ अशा प्रकारच्या अभिव्याक्तिचा जर वापर केलात, तर ‘आई-बाबा आपल्या बोलण्याकडे नीट लक्ष देतायत. कारण त्यांना आपली काळजि आहे,” अशी त्यांची सकारात्मक समजूत होण्यास नक्की मदत होते. आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाते, ही गोष्ट खूप मोठ मानसिक समाधान देणारी ठरू शकते मुलांसाठी.
०५. जेव्हा तुमचं मूलं तुमच्याशी बोलत असतं, तेव्हा त्याला त्याचं म्हणणं पूर्णपणे सांगू द्या. ते मध्येच तोडू नका. मला हे अजिबात आवडलेले नाही. तू मूर्ख आहेस कां? मला हे मान्य नाही वगैरे नकारात्मक वाक्यांचा वापर शक्यतो टाळा. कारण मग संवाद बाजूला राहून वाद सुरू होतो. त्याने सशक्त, सकारात्मक संवादाला बाधा येऊ शकते. म्हणून मुलांच्या नवनविन कल्पनांचे, विचारांचे स्वागत करा. म्हणजेच या सगळ्याकडे सकारात्मक नजरेतून बघा. मग काय होइल? तर नकळतच वरचेवर सुसंवाद घड्ण्यास सुरूवात होइल. असं म्हणतात, मूलं म्हणजे देवाघरची फुलं! तेव्हा त्यांना कधीच कोमेजू देऊ नका. तुमच्या ‘संवादरूपी’ प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर होऊ द्या आणि मग बघा, तुमचं असं फुलांनी बहरलेलं घर कसं प्रसन्न दिसतं ते! म्हणून आता अजिबात वेळ जाऊ देऊ नका, कारण शुभस्य शीघ्रम! बरोबर आहे ना?
संबंधित पुष्प:
01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
No comments:
Post a Comment