Sunday, February 1, 2009

Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)

बाळाच्या जन्माचा सर्वात जास्त आनंद त्याच्या मम्मी-पप्पांना होतो. मुलांसोबत मम्मी-पप्पा मूल होउनच खेळत असतात. मुलांनाही ते आवडते; पण जेव्हा मुले मोठी होऊ लागतात, तेव्हा त्यांना प्रत्येक बाबतीत मम्मी-पप्पांची लुडबुड खटकु लागते, मुले मोठी झाल्यानंतरही आई-वडिल त्यांना लहान समजून त्यांच्या प्रत्येक कामात टोकाटोकी करू लागतात ते मुलांना आवडत नाही, इथुनच वाद सुरू होतात.

आई-वडिल टोकतात तेव्हा:

नव्या पिढितिल मुले आपले जीवन स्वतंत्रपणे जगू इच्छित असतात. त्यांची एक वेगळी lifestyle असते. याचा अर्थ त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नसते असा नव्हे; पण मम्मी-पप्पा मुलांवर एवढी बंधने लादतात की, मुले त्यांचा विरोध करू लागतात वा निमुटपणे सारे सहन करीत राहतात.

प्रत्येक छोट्या मोठ्या कामातील आपले टोकणे मुलातिल व आपल्यातील दुरावा वाढवत नेतो.

आमचेही ऐका:

मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी टोकणे वा स्पष्ट नकार देण्यापुर्वि आई-वडिलांनी त्यांचे म्हणनेहि ऐकायला हवे. नंतर विचारपूर्वक कोणत्याही गोष्टीला तर्कसुसंगत उत्तर द्यायला हवे, यामुळे मुलांनाही चांगले-वाईट कळु लागते. प्रत्येक बाबतीत आई-वडिलांचा नकार ऐकून मुले त्यांना काहीच विचारीनाशी होतात. नेहमी नकारात्मक धोरण ठेवण्यापेक्षा कधीकधी मुलांसोबत सकारात्मक्तेनेही वागा. त्यामुळे मुले आपल्या मनातील विचार स्पष्टपणे बोलून दाखवतील.

ज़माना बदलला आहे:

काही पालक आपल्या मुलांना नेहमी स्वत:च्या काळातिल उदाहरणे देत असतात; परंतु आजच्या बदलत्या काळात त्यातील प्रत्येक उदाहरण चपलख बसु शकत नाही. आता ज़माना बदलला आहे त्यानुसार लोकांचे विचारही बदलले आहेत. हल्ली शाळा कॉलेजात मुले-मुली एकत्र शिकत असतात. त्यामुळे जर आई-वडिलांना वाटत असेल की त्यांच्या मुलाने मुलींशी वा मुलीने मुलांशी बोलू नये तर हे शक्य नसते. आई-वडिलांनी बदलत्या काळानुसार विचारही बदलायला हवेत.

तेव्हा बदलणार ना तुमचे विचार?

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संततिवर परिणाम शक्य)
Post a Comment