Sunday, April 26, 2009

A judgement court for kids (शोषित पिढीत मुलांना न्याय लवकर मिळावा म्हणुन ख़ास न्यायालयाची स्थापना)

न्याय सर्वांसाठी सारखा असतो, आणि न्यायालयापुढे प्रत्येक माणूस समान दर्जाचा असतो. तत्त्वत: हे खरे आहे; पणतारीख पे तारीखया परंपरेमुळे आपल्याकडे न्यायदानात अक्षम्य विलंब होतो. या बाबतीत विलंब म्हणजे न्याय नाकारल्यासारख आहे. हे लक्षात घेउन राज्य सरकारने लहान मुलांच्या बाबतीत अशी चुक होऊ नये, म्हनून त्यांच्याकरता ख़ास न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांविरुद्ध गुन्हे करणा-यांना ताबडतोब सजा देऊन अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसावी असा उद्देश्य यामागे आहे. सरकारी निर्णयानुसार इथून पुढे मुख्य सत्र न्यायाधीश आता मुलांविरुद्धाच्या गुन्ह्यांची प्रकारणे एकाच सत्र न्यायाधिशाकडे सोपवतील. “बाल न्यायाबद्दलचेनोटिफिकेशनराज्य सरकारने नुकतेच काढले असून, आता त्यानुसार मुंबई हायकोर्टाचा प्रशासन विभाग निरनिराळ्या राज्यांमध्ये विभागवार न्यायालयाची स्थापना करील.

न्यायालयीन संकल्पनेनुसार लहान मुलांमध्ये १८ वर्षापर्यतची मुले येतात. त्यांच्याविरुद्ध घड़णा-या सर्व प्रकारच्या शोषणाच्या (लैंगिक, शारीरिक, भावनिक) अपहरणांच्या आणि हिंसेच्या गुन्ह्यांची दखल या ख़ास न्यायालयांमध्ये घेतली जाईल.

मुलांच्या अधिकारांची दखल घेणारा कायदा २००५, मध्ये संमत झाला आणि २००६ च्या जानेवारीमध्ये त्याच्या अंमलबजावनिला हिरवा दिवा मिळाला, त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे. तिचे स्वागत करताना राज्य कायदा सचिव एम्. एन. गिलानी यानी असे म्हटले आहे, “एक कोर्ट एक जज्जही न्यायदानाची फार चांगली पद्धत ठरेल. तिच्यापुढे वकील आणि न्यायाधीश यांचा अभ्यास न्यायादानाचे कौश्यल्य वाढविण्यासाठी मदत होइल. राष्ट्रसंघाशी १९९२ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार हां कायदा प्रस्तावित करण्यात आला.

लैंगिक शोषणासाठी मुलांचा व्यापार करणारे दलाल आणि होटेल चालक, विशेषतः लहान मुलींची विक्री करणारे चालक यांच्यावर कठोर तत्त्काळ कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा लहान मुलांसाठी न्यायाची मागणी करणा-या कार्यकर्त्यांनि व्यक्त केली आहे. लैंगिक शोषण, अत्याचार हिंसाचार यांच्याबरोबर लहान मुलांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर अवाजवी निर्बंध लादणे या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घ्यावी, असेइंटरनल जस्टिस मिशनया मुलांच्या अवैध व्यापाराविरुद्ध लढणा-या संघटनेच्या प्रतिनिधि अँडव्होकेट मिशेल मेंडोसा यानी म्हटले आहे. त्या म्हणतात, “मुलांचा व्यापार लैंगिक विकृति भागविण्यासाठी होतो, की कमी पैशात राबवून काम करुन घेण्यासाठी होतो, या चर्चेपेक्षा त्यांचा व्यापार गुन्ह्यांमध्ये जमा होणे ही खरी महत्वाची गोष्ट आहे. मुलांसाठी स्थापन होणा-या न्यायालयाचा उपयोग या गंभीर गुन्ह्यांची तातडीने दखल घेण्यासाठी व्हायला हवा. अशा अनैतिक कारणासाठी मुलांना पळवुन नेले जाते. त्यांच्या कुटुंबियांपासून दूर ठेवले जाते. तिथे त्यांचा छळ होतो ते वेगळेच; पण अपरिचित वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर जो गंभीर परिणाम होतो, त्यातून बाहेर पडायला प्रदीर्घ काळ लागतो, याची सर्वप्रथम दखल घ्यायला हवी.

हा विषय इथे मांड्ण्याचा उद्देश एवढाच की, आज रद्दी घालण्यासाठी घरातील सर्व पेपर काढत होतो आणि अचानक दिनांक जानेवारी २००९ च्या पेपरमध्ये एक बातमी नजरेसमोर आली की एका डाँक्टरने प्रसूत झालेल्या महिलेचे बाळ त्यांच्या कुटुंबियांकडून दवाखान्याचे बिल भागवू शकल्यामुळे परस्पर एका विदेशी माणसाला एक लाखात विकले. मला वाटते आपण सर्वानी ही बातमी वाचली असेल. अशा डांक्टरांविरुद्ध काय कारवाई व्ह्यायला पाहिजे त्यावर तुम्ही विचार करा. हा भाग वेगळा की, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना जेव्हा हे सर्व समजले तेव्हा त्यांनी त्या डाँक्टरच्या तोंडाला काळे फासले आणि बरीच मारहाण केली. परंतु प्रश्न हां आहे की केवळ तोंडाला काळे फासण्याने आणि मारहाण करण्याने हां प्रश्न सुटणार आहे का? काय शिक्षा व्हायला हवी अश्या या हैवान डाँक्टरला. सजा--मौत की ….. ????

संबंधित पुष्प :

01. Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - १
02. Child's Global Fleshiness : Child's Global Fleshiness : (मुलांमधिल लट्ठपणाचा जागतिक रोग) - २
03. Child's Global Fleshiness : How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
04. Kid's Breakfast (मुलांचा खाऊ )
05. Be aware about kid's fever (मुलांचे तापेपासून स्वंरक्षण)
06. ICU : Ice Cream Unit
07. A Solution on Bed Weting : Homeopathy (मुलांच्या बेड वेटिंगवर उपाय)
08. How to measure weight? (वजन कसे मोजावे?) - ३
09. Sweet Medicine on Maleriya (मलेरियावर गोड औषध)
10. Kids and Rules of Massage (मुले आणि मालिश करण्याचे नियम)
11. What is the importance of beauty sleep in your kid's life? (मुलांसाठी झोप किती महत्वाची?)
12. Anti Oxidents : Keep Disease Away (एंटी आँक्सिडेंटस : दूर ठेवा आजारपणाच्या तक्रारी)
13. Milk : The Best Food Forever! (दूध एक उत्तम आहार)
14. If someone afflicted at home (घरात जर कुणी आजारी असेल तर )
15. Kids, please do not habitual with Fast Food..!!!
16. How toxins enter our body?
17. Useful Websites for Kids (मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स)
18. While Conversation With Kids (मुलांशी संवाद साधताना)
19. Cryos : The First International Sperm Bank In India (भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वीर्य बैंक)
20. Stressful Period Before Delivery May Affect the Growth of Your Baby (प्रसूतिपूर्व काळात ताणाचा संतातिवर परिणाम शक्य)
21. Mom and Dad,Please change your attitude (मम्मी आणि पप्पा आता तरी बदला ना!)
22. Calcium Bank for your child
23. Kindergarchy : The Rules by Children
24. How safe are baby products?
25. How important the stickers on baby products?
26. What to do before your baby comes?
27. Baby Products - Money Saving Tips
28. Adults too can suffer from Whooping Cough
29. What's wrong with baby? Yeah! They are crying!
30. Calcium may significantly improve kid's bone health
31. An open letter to all young mom
32. Acne Products : Your Transforming Skincare
33. Some Health Tips for you all
34. How to get cured of diarrhoea - 1
35. What causes Diarrhoea? - 2
36. Tongue display helps recover balance problem
37. Diarrhoea in Children - 3
38. Get prominent skin with Resurgence
38. Homework in progress - 1
39. Homework in Progress : Regular overview - 2
40. Protect your grandparents with Medical Alarm
41. Homework in Progress : Make it a Quiz Time - 3
42. Homework in Progress - Postitive Feedback Counts - 4
43. Get Tea Bonanza at EnglishTeaStore.com
44. Homework in Progress : Break Point - 5
45. Homework in Progress : Do not think twice, just log on - 6
Post a Comment