पालकत्व हे खरेच अवघड काम आहे यात शंकाच नाही (असे मी माझ्या स्वानुभावावरुन तरी म्हणु शकतो!). पालकाचे पालकत्व हे मुलाचा बाह्यंगिण अविष्कार घडवून आणतो आणि मुलांना शिस्त, प्रामानिकपणा, आदर आणि स्वाभिमान शिकवितो.
परंतु पालक हे नेहमी मुलांना वाढविण्यासाठी वेगळा विचार करीत असल्यामुळे प्रत्येक पालकाची एकच विचारसरणी होउन बसते आणि ती म्हणजे, "त्यांचा मुलगा हा नेहमी आणि कायमस्वरूपी सगळ्यात पुढे असावा!"
जेव्हा त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टींचा उलट चेहरा समोर येतो तेव्हा आपसुकच पालक मुलांच्या नवीन विश्वातील घटनांचा विचार करायला लागतात आणि मुलांच्या नवीन विचारास नकळत मान्यता द्यायला लागतात. खरेतर आजपर्यंत perfect पालक होण्याचे पुस्तक अजूनतरी अस्तित्वात आलेले नाही. तरीही मी आजपर्यंत वाचलेली हि दोन पेपरबॅक सुंदर पुस्तके "Unconditional Parenting" आणि "Book You Wish Your Parents Had Read" कोणत्याही पालकाला मुलांच्या हृदयात कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी किंवा पालकत्व कसे असावे हे कळण्यासाठी खूप महत्वाची आहेत. नवीन पालकत्व स्वीकारलेल्या मुलांच्या आई आणि बाबांनी हि पुस्तके जरूर वाचावीत. त्यामुळे सर्वसाधारण पालकत्वाचा अंगीकार करुन किंवा आपल्याकडून काय चुक होत आहे हे समजुन घेउन मुलांशी प्रेमळ आणि विश्वासपूर्ण संबंध निर्माण करायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे ना?
संबंधित पुष्प :